रानभाज्या


राना मधील भाज्या

१ मेका 
मेकाचे वेल काकडी सारखे असते ह्याचे फळ तोंडली सारखे दिसते. तिला छोटे छोटे हिरव्या रंगाचे पांढरे पट्टे असलेली फळे येतात. हे फळ काकडी सारखे लागते. या फळांची भाजी बनवितात व तसेच हे फळ काकडी सारखे लागते. या फळांची भाजी बनवितात व तसेच पिकलेली फळे खातात. 

२ आळिंबी 
आळिंबी म्हटले कि फाईव्ह स्टार हॉटेलची आठवण येते. पण आधुनिक शेतीच्या सहाय्याने आळिंबीवर अनेक संशोधनाच्या सहाय्याने प्रकल्प राबवले जात आहे. आळिंबीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहे. पण आदिवासी लोकांना अतिप्राचीन काळापासून आळिंबी आपल्या आहारात घेत आले आहेत. लागवडीसाठी तंत्रज्ञान नसले तरी आळिंबी उगविणारे ठराविक ठिकाणे त्यांना ठाऊक असतात. पावसाळ्यात ते रानामधून अळिंबी उपलब्ध होतात. 

३ भुईफोड 
आळिंबी प्रमाणेच दिसणारी मात्र पूर्ण अंड्याच्या आकाराची वनस्पती जंगलात पावसाळ्याच्या दिवसांत मोजक्याच ठिकाणी उगवितात. चवीला आळिंबीपेक्षाही भुईफोडाची भाजी चंगली असते. 

४ घरकंद 
रानामधे असंख्य प्रकारचे कंदमुळे आढळतात तरी सुधा घराच्या अंगणात लागवड केली जाते. लागवड केलेल्या कंदाचा प्रकार म्हणजेच "घरकंद" होय. या पासून जमिनीत व वेलीवर येणारे दोन्ही ठिकाणीचे फळे खाण्यासाठी वापरतात. जमिनीतील फळांना असंख्य छोटे छोटे मुळे असतात. हे असले तरी दोघांची चव सारखीच असते. याची भाजी बटाट्याच्या भाजी प्रमाणे बनवितात. 

५ वाथरटा/कुलूम/राजकुवर 
या अळिंबी वर्गातील वनस्पती त्यांच्या आकार, चव, शिजवून तयार करण्याची पध्दती कशी आहे. यावरून विविध नावांनी परिचित आहे. या सर्वच वनस्पतींचे आयुर्मान एका दिवसाचे असते. दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची कला या लोकांना अवगत नाही. या सर्व भाज्या अळिंबी वर्गातील आहे. 

६ कर्टूले/कर्टूल 
कर्टुले हे मोठया बोर किंवा लिंबाच्या आकाराचे काटेरी फळ असते. ही जंगली भाजी आषाढ, श्रावण व भाद्रपद (पावसाळ्यात) जंगलात डोंगराळ भागात आढळून येतात. ही भाजी चवदार असते.






७ भोकरीच्या झाडाचे मोहोर 
भोकरी या वनस्पती झाडाला फाल्गुन, चैत्र व वैशाख (एप्रिल आणि मे)महिन्यात मोहर येतो. मोहर आल्यावर कोवळ्या मोहराची भाजी बनवितात. याला "मुंगळ्यांची भाजी" म्हणतात. ही भाजी अतिशय चवदार लागते. 

८ मोहाचे झाड 
मोहाच्या झाडाचे फळ ह्याला खान्देशी भागात टोळमे किंवा टोळम्या ह्या नावाने ओळखले जाते. कोवळ्या फळांना भाजून त्याची सालीची चटणी करतात. तर काही भाजी ही बनावीतात. मोहाच्या झाडाच्या फळामधील बियांण पासून तेल ही काढले जाते आणि मोहाच्या सुकलेल्या फूला पासून दारू/मद्य ही बनविता येते. 



९ आकऱ्या 
पावसाळ्यात डोंगर कपाऱ्यात निवाऱ्याच्या बाजूने खडकावर उगविणारी पापुद्रयासारखी एका बाजूनं हिरवट पांढऱ्या रंगाची वनस्पती म्हणजेच आकऱ्या याची भाजी बनवून खातात.ही भाजी दुर्मिळ भाज्यांपैकी एक असून जास्त पाऊस असलेल्या डोंगराळ भागातच उपलब्ध होते. 

१० वास्ता 
बांबूच्या उगवणाऱ्या नव्या कोवळ्या कोंबापासून बनविलेल्या भाजीला "वस्त्याची भाजी" म्हणतात. "वस्त्याची भाजी" म्हणतात. ही भाजी किसून वाफेवर उकळून घेऊन मोहरीची फोडणी दिल्यास अतिशय रूचकर लागते. 

११ दिघवडी 
अनेक बिनविषारी वेलींचे शेंडे म्हणजेच कोवळी पाने तोडून एकत्र करून बनविलेल्या भाजीला "दिघ वडी" असे म्हणतात. 

१२ शेवळू/लोती 
पहिला पाऊस पडला, की अनेक रानभाज्या जंगलात आढळतात. सतत पाऊस असलेल्या परिसरात आढळणारी कंदवर्गीय वनस्पती म्हणजेच शेवळू यात कंदापासून व पाल्यांपासून दोन प्रकारच्या वेगळी चव देणाऱ्या भाज्या बनविता येतात. म्हणूनच कंदापासून बनलेली शेवळू तर पाल्यापासून तयार केलेली लोती असे दोन भाजी प्रकार पडतात. 

१३ चाईचा मोहर 
रताळी, गाजर व मुळा यासारखे कंद असलेले एक वेलवर्गीय वनस्पती उगविल्यानंतर दोन महिन्यांच्या आत तिला मोहर येतो. हा मोहर भाजी म्हणून आहारात घेतात. तर चाईचा कंद भाजून खातात. 

१४ उळशीचा मोहर 
उळशी च्या वेलीला मोहर पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात येतो. या मोहरांची भाजी बनवून खातात ही  भाजी अतिशय चवदार असते. ही भाजी कांदा, लसुण, चटणी, मीठ घालुन ही भाजी बनवली जाते.  



  
    
   

      

2 comments: