गौराई गीत

गौराई गीत - १


गंभीर गडावर गं मैना,

चंदणी मिलकली गं मैना,

चंदनी नको म्हणू गं मैना,

ढोलकऱ्याची राणी गं मैना ।


बारवा पाण्या गेली गं मैना,

बारवा नको म्हणू गं मैना ...,

जोडव्याच्या ठसक्यानं गं मैना,

बारवा ढासळली गं मैना ।


दगडीच तळघर गं मैना,

बेडकाचे माहेरघर गं मैना,

तहे का बार गं मैना,

आत कपार खोल गं मैना,

बेडकाचे तळघर गं मैना ।



गौराई गीत - २

घे गौराई तांब्यात पाणी

तांब्यात पाणी वं घे गौराई तांब्यात पाणी ।।धृ ।।

चल जाऊ मळा शिपाया.. शिपाया..

मळा शिपंला कठोकाठी.. कठोकाठी..

वांगी लागल्या डोसो-डोसी..डोसो-डोसी..

वांगी खुडल्या भरल्या पाटया.. भरल्या पाटया..

पाटया फेडल्या भरल्या गाडया.. भरल्या गाडया..

गाडया लावल्या मरगाला

                              घे गौराई १


ईकाया नेल्या जेजूर गडाला

जेजूर गडाचे माळीन बाई वं ,

तुझ घर कोन्हे आळी ,

माझे घर सूर्यतळी,

तुला राजा बोलवितो,

काय कामा बोलवितो

तुला जोडऊ देववितो ।

                   घे गौराई २



गौराई गीत - ३


तिस तांदूळ सडलं, एक तांदूळ उडाला

सभे मंधी पडला, अशी सभा खोल गं ।

रामजी वाजवं ढोल वं

रामजीच्या हाती कन्हेरी काठी,

रामजी लागला दैता पाठी ।

दैत माझा मूल वं

कमळाय माझी सून वं

उठ व कमळा दिवा लाव,

दिवा लावता आला चोर,

दिवा विझला वाऱ्यानी,

कमळाय नेली चोरानी ।

खांदी न्याव की कवळी न्याव,

समिंदराच्या मेव्हलं,

असा समिंदर खोल वं, फुला वेचत गेलं वं ।

फुलात होती अबय, नाव ठेवू भिमाय,

सागर गोटां केजेचा, भाऊ माझा राजेचां ।

No comments:

Post a Comment