पदार्थ (आहार)

उत्सव व समारंभ अथवा आनंदाचा दिवस असला म्हणजे मेजवानी आलीच. मग या दिवशी नेहमीप्रमाणे वेगळे पदार्थ आहारात घेणे सर्वच जण पसंत करतात. कोकणी लोकांची खासियत असलेले पदार्थ आहेत. जे विशिष्ट सणावारांच्या दिवशी रुचीपालट म्हणून बनवितात. 

१ सावला (पंनगा/सविला)

जंगलातील(राना) मधील मोठी काकडी किसून किंवा आतील गर बारीक करून त्यात तोडासा गूळ किंवा साखर आणि मकाचे पिठ गव्हाचे पीठ घालून एकत्र वाटून मिश्रण तयार करून मोहाच्या झाडाच्या दोन पानांच्या मधोमध दाबून उकळत्या पाण्याच्या वाफेवर शिजवून घेतात. तेव्हा सावला(सविला) तयार होतात. पुरवी कुकर नव्हते तेव्हा सावला वाफेवर शिजवण्यासाठी एक टोपात थोडे पाणी घालून पिण्याच्या थोडे वर पर्यत टोकराचे (बांबू)ह्याचे फांदया ठेवून त्यावर सावला ठेऊन उकळून घेत असे.  

२ पेज (खिर/घाटा)

मे महिन्यात उन्हाचे प्रमाण जास्त असते. या दिवसांत रानावनात फिरणाऱ्या माणसांची तहानेची तीव्रता कमी व्हावी म्हणून तहानशामक व सकाळच्या नाश्त्यासाठी पेज आहारात घेतात. पेज म्हणजे मक्याचे जडे भरडे पीठ शिजवून तयार केलेली पेज होय. ही पेज बनवण्यासाठी वाकीच्या व ज्वारीच्या पीठाचाही उपयोग करतात.

३ गव्हाची खिर 
सर्वपित्री आमावस्याच्या पहिल्या दिवशी कोकणी लोक पित्रांना नैव्यद्य दाखवून पित्री जेवण देतात. या दिवशी खास पदार्थ म्हणून गव्हाची खिर बनवितात. रात्री गहू ओले करून ठेवतात. सकाळी अख्खे गहू उखळात कुटून घेतात व खोबरे आणि गुळ घालून खीर शिजवितात. त्यावर दुध व गावठी तूप आवश्यकतेनुसार घालतात. खीर बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. खीर अतिशय चवदार लागते. 

४ उंडा 
भात व नागलीच्या लावणीच्या काळात शेवटी-शेवटी कामगारांसाठी मेजवानी म्हणून गोड जेवण ठेवतात. त्यातील उंडा हा एक पदार्थ गहू किंवा तांदळाच्या पिठाच्या लहान आकाराच्या जाडसर पोळ्या बनवून त्यावर गुळ व शेंगदाणे ठेवून आर्धी पोळी दुमडून शिजवून उंडा तयार करतात. 

५ राजगीराची कोंडी 
उपवासाच्या दिवशी राजगीरा भाजून कुटून घेतात व त्यात थोडा गुळ घालून खातात तर काही लोक पांढरी ज्वारी म्हणजेच गावठी दादरच्या लाह्या भाजून ही खातात तर काही लोक लाह्या भाजून दळून पीठ करून त्यापासून कोंडी बनवितात. 

६ तांदळाचे पोहे
भत काढणीच्या थोडे दिवस अगोदर तांदळाचे दाणे पूर्ण पक्के होण्याआधी अर्धे कच्चे तांदळांच्या ओंब्या काढून भाजून घेतात व उखळात कुटून पोहे तयार करतात.

७ तांदळाचे धिंडरे
संक्रांतीचा सकाळचा स्वयंपाक चुलीच्या भानोशिवर तांदळाच्या पीठाने भरलेल्या हाताचा पंजा(ठसा) मारून सुरवात होते. तापलेल्या तव्यावर थोडेसे तेल पसरून भोपळ्याच्या डवलीच्या सहाय्याने तांदळाचे साखर घालवून भिजवलेले पीठ सोडतात. पीठ तव्यावर पसरविण्यासाठी अर्धा कापलेला कांदा अथवा अळुची अर्धी कांदी वापरली जाते. यामुळे धिंडऱ्यांना योग्य आकार मिळतोच, शिवाय चवीलाही चांगले लागतात. 

No comments:

Post a Comment