होळी

          होळी हा सण हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो म्हणजे दरवर्षी प्रमाणे मार्च महिन्यात होळी असते. होळी हा सण महाराष्ट्रात मोठया आनंदाने साजरा करतात. विशेषतः कोकण, नाशिक, विदर्भ, खान्देश इत्यादी ठिकाणी होळी हा सण त्या ठिकाणच्या रुढी परंपरानुसार साजरा केली जातो. 

          होळी हा सण आमच्या गावात मोठया आनंदाने साजरा केला जातो होळीच्या पहिल्या पौर्णिमेपासून सुरवात होते. या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा (दांडी पूणेव) म्हणतात. पौर्णिमाच्या चंद्राची पहीली किरण दिसल्यावर खोंडे (खोडया) बाळाने (जाळणे) चालू होते. खोडया जाळल्या नंतर ते जमीत गाडून लपून ठेवतात जर कोणाला खोडया (लाकडाचा न जळलेला भाग)  कोणाला भेटला तर ते फाग (पैसे)  मागतात हा कार्यक्रम १५ दिवस म्हणजे होळी र्पयंत चालू रहाते. 

          होळीच्या पहिल्या दिवशी वाळलेले लाकडे घेण्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीला यावे लागते. वळलेले लाकडे जमा करून दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या व्यक्तीने लवकर वळलेले लाकडे (फारका) आणून टाकले त्याला १ नारळाची वाटी व गुळ दिले जाते.

          होळीच्या दिवशी सकाळी उठून घरातील एका व्यक्तीने होळी सजवण्यासाठी गावाबाहेर यावे लागते. सकाळी गावाच्या थोडया बाजूला येऊन रस्त्याजवळ जेथेकुठे सावली असेल अशा ठिकाणी बसून होळी सजवतात होळी बेहडा, (पेहडा) सावर, पोळसाचे फुले (पळस) सुर्यफूल आंब्याचे पाने इत्यादी झाडांचा वापर होतो. सकाळी पासुन सर्व तयारी सुरू असते. सकाळी होळी सजावटीसाठी गेल्यावर गुळ आणि नारळ वाटतात, प्रत्येक होळकरला नारळ गुळ द्यावे लागते. होळी सजावट करून असताना बाकीचे होळकर " फाग " धरतात "फाग" ही पुर्वीपासूनची प्रथा असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाडया अडवून त्यांच्याकडून फाग मागितला जातो नाही दिला तर गाडी पुढे जावू देत नाहीत "फाग" म्हणजे त्यांच्याकडुन १, २, ५, १०, ५० असे पैसे (फाग) मागीतले जातात. सकाळी पासुन तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत होळी सजवतात.

          होळी सजवून झाल्यावर वाजत गाजत तिची मिरवणुक काढून होळी गावात आणली जाते गावात आल्यावर ज्या ठिकाणी होळी पेटवायची आहे. त्या ठिकाणी नेवून ठेवतात व मग जागल्या आरोळी देवून सर्वाना होळीसाठी वाटी - पापडया बांधण्यासाठी  आमंत्रण देतो.

          ज्याचा मान असेल त्याने होळीजवळ येवून परवानगी घ्यावी लागते ती अशी "पाटील, सरपंच, महार जागल्या गावकरी मंडळी पापडया बांधयला हुकुजवळ असलेले गावातील लोक अनुमती देतात. "हुकुम हुकुम" मग पापडया बांधायला सुरुवात होते प्रत्येकाला पापडया बांधला अनुमती मागावी लागते. पापडया बांधून झाल्यावर होळी उभी करायला सुरुवात करतात होळी उभी करताना सकाळी पासूनच डोक्यावर टोपी ठेवावी लागते. टोपी नसेल तर दंड (दडी) गोळा केली जाते ज्याच्याकडे नसेल त्याला ५ नारळ किंवा १०१ रूपये  द्यावे लागतात. होळी पेटल्यावर बोंबलतात.         

          "होळी पेटणी पेटणी रं , ओड्ड ओड्ड ओड्ड" त्यानंतर होळीला त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यासाठी प्रत्येक घरातील दोन व्यक्ती येताना एकाकडे नैवेद्य दुसऱ्याकडे पाणी असते. होळीला नैवेद्य देताना होळी भोवती ५ फेऱ्या मारून नैववेद्य कर्यक्रम पूर्ण होतो प्रसाद म्हणून घुगऱ्या वाटतात घुगऱ्या मध्ये हरभरा गहु यांचा समावेश असतो त्यानंतर गावातील लहान बालकांचे जावळचे नारळ होळीत अर्पण करतात. कोणी पेढे टाकताना कोणी नारळाची वाटी तर कोणी नारळ टाकतात होळी पडल्यावर गावातील प्रतिष्टीत व्यक्ती किंवा कोणाला तरी होळीचा खंबा काढतो व नंतर गावातील सर्व लोकांना सुखी राहू दे याबाबत सर्व मिळून प्रार्थना करतात. त्यानंतर सर्व लोक होळीचे दर्शन घेऊन होळी भोवती जमा होतात. होळी जवळच एकमेकांनी भेटतात हे सर्व झाल्यावर जेवण करण्यासाठी घरी जावून झोपण्यासाठी होळीजवळ येतात.
          अशा पद्धतीने  आमच्या गावात होळी साजरी केली जाते.
         










  

No comments:

Post a Comment