|| सप्तशृंगी देवी ||




 नाशिकच्या उत्तरेस ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पुर्व पश्चिम पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फूट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य व भक्तीने भारावलेले वातावरण आहे. भाविक पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.  
सप्तशृंग गडाचा पुर्वेला असलेला गणेश मंदिर व शितकडाच्या आजूबाजूला बारमाही पाण्याने तुडूंब भरलेली धरणे हे आकर्षण होय. या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी नाशिक येथून नांदुरी या गावी येऊन सप्तशृंग गडावर येता येते.  चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे येथील भाविक हे वारंवार मंदिराला भेट देतात.    




     वाणी हे अर्ध शक्तीपीठ आहे. सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रुंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली,महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शूंभनिशूंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.          

     
     आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रुपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी याचना केली अन होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.         


देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वर्ज व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्पटिकमाला,ब्रम्हदेवांचे कामंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्वकर्माचा तीष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे. त्याबाबतची कथाही गमतीदात आहे. गडाजवळच्या दरीजवळ मर्कंडेय ऋषी तपश्चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असेल.      


    


     
  


No comments:

Post a Comment