आखाती (अक्षयतृतीय) सण

     आखाती हा सण मराठी महिन्यांप्रमाणे वर्षाचा हा शेवटचा सण कोकणा लोक मोठया उत्साहात साजरा करतात. त्यासाठी लाकडाची दीड फूट उंच गौराईची मूर्ती बनवून तिला गुंज, (वेलवर्गीय वनस्पतीच्या बिया) रंग बारशिंग तसेच जांभूळ, करंज, चाफा, पत्री चढवून सुशोभित करतात. हा कर्यक्रम अक्षयतृतीया (आखाती) च्या १५ दिवस आगोदर पासून सुरू होतो. याशिवाय पहिल्या दिवशी वारुळाच्या मातीपासून घोडयावर बसलेल्या शंकराची मुर्ती तयार करतात. व गव्हाच्या पीठाची ५ दिवे बनवून आरास बनवतात. याच वेळेस धान (धान्य) टाकतात. एक छोटया टोपलीत मका, बाजरी, सावा, गहू, ज्वारी अशी ५ धान्य टाकून त्याला दररोज नियमित पाणी घालतात.
   
     या दिवसात  गावातील मुली एकमेकांच्या घरी जावून गाणे म्हणतात व जेवणाचे आमंत्रणही देतात. अक्षयतृतीयाच्या दिवशी पहाटे पासूनच सणाला सुरूवात होते. घरातील सर्व कृषी-अवजारे व शस्त्र यांना हळद कुंकू लावून पूजा करतात व गौराई वाहतात. यादिवशी स्त्रिया गौराईचाच गजरा डोक्याला मळतात.

     आखातीला शेतातील सर्व कामे बंद असल्याने सर्व लोक गावातच थांबतात. शिवाय कोणत्याही प्रकारचा वैयक्तीक धार्मिक विधी या दिवशी शक्यतो करत नाहीत. सकाळी गावातील प्रमुख व्यक्ती एकत्र जमून गावशिवार व शिवेवरील देवतेची पूजा करण्यासाठी पूजास्थानी जमतात. दगडाच्या देवतेला शेंदूर लावून गौराई वाहतात आणि गेल्या वर्षी प्रमाणेच येत्या वर्षातही चांगला पाणी - पाऊस होऊ दे ! सुखसंपदा लाभू दे ! अशी विनवणी करतात. एकत्र बसून विचारविनिमय करतात शिवाय आपापसातील वैरभाव विसरण्याची अपेक्षाही ठेवतात. यात समाजातील गरीब-श्रीमंत असे सर्वच एकत्र येतात. सायंकाळी स्त्रिया, मुली व काही उत्साही पुरुष आप-आपल्या गौराई डोक्यावर घेऊन मंदिराजवळ जमा होतात. येथे समूहनृत्य व टिपरीनृत्य सुरू होते. ढोल-ताशाच्या गजरात नृत्य करत ही सर्व मंडळी गौराई विसर्जनासाठी नदीच्या दिशेने निघते. नदीवर गौराईची पूजा करून गौराई विसर्जनाचा कार्यक्रम करतात . याप्रसंगी सादर केली जाणारी काही निवडक गीते -

गीते - https://kokanikokanasmaz04.blogspot.in/p/blog-page_28.html


1 comment:

  1. अश्या प्रकारच्या सन कोकणी लोक साजरा नाही करत.
    हे काढून टाकावे.
    क्रुपया कोकणी भाषेत या सनाला काय म्हणतात ते लिहावे, हिंदू कलेंडर नूसार नका लिहू.

    ReplyDelete