सर्वपित्री अमावस्याचा सण (उत्सव)

     पितर पाटयाच्या महिन्याचा शेवट सर्व पित्री अमावस्येला होतो.  यादिवशी कोकणा लोक पितरांना नैवेदया दाखवितात. भारतीय  संस्कृतीत पुनर्जन्मावर विश्वास असल्याने आपल्या घराण्यात होऊन गेलेल्या आजोबा , पणजोबांचे आपल्यावर कृपाछत्र असावे. त्यांच्या अतृप्त इच्छांचा कुटुंबावर कोप होऊ नये. म्हणून पितरांची पूजा करतात.  आपल्या पितरांना नैवेदया दाखविण्यासाठी कोकणा लोक पुरणपोळीचा आगाऱ्या (नैव्यदय) टाकतात. त्याशिवाय पितरांची शांती होत नाही अशी धारणा आहे.

     सर्वपित्री अमावस्येला आख्खे गहू भिजवून तयार केलेली खीर, उंडा ,पानगा,सावला व इतर पदार्थ या निमित्ताने खास मेनू म्हणून बनवितात. भारतीय संस्कृतीनुसारच हे लोक सर्व सण मोठया उत्साहात साजरे करतात. त्यासाठी निसर्गातील रंग-माती, फुले, पाने यांचा मेळ घालून उत्सवात वेगळीच नैसर्गिकता दाखवितात.
      

No comments:

Post a Comment