श्री. कन्हैय्यालाल महाराज मंदीर

!! श्री. कन्हैय्यालाल महाराज !!
स्वप्नातुन साकार झालेले देवस्थान 
श्री. कन्हैय्यालाल महाराज मंदीर, आमळी 



     सुमारे आठशे वर्षा पूर्वी गुजरात येथील सौराष्ट्रात डाकोर या गावी एक महान हरीभक्त राहत होते, ते दर पौर्णिमेला द्वारका येथे दर्शनासाठी जात असत, संपुर्ण आयुष्यभर त्यांनी पौर्णिमेला द्वारका येथे दर्शनासाठी जाणे कधीच चुकवले नाही, पुढे वयामानामुळे त्यांना डाकोर येथुन द्वारका येथे दर्शनासाठी जाणे कठीण झाले, तेव्हा भगवंतानी त्यांना स्वप्नात येवून सांगितले, की तुला द्वारका येथे येण्याची आवश्यक्ता नाही मी स्वतःच तुझ्याकडे येतो त्याच प्रमाणे द्वारकेत असलेली श्री हरींची मुर्ती चक्क डाकोर येथे रात्रीतुन प्रकट झाली.


     त्यानंतर अनेक वर्षे उलटल्या नंतर "मुल्हेर" येथील त्यावेळचे राजे तांबेदास महाराज हे होते. त्यांना एके दिवशी भगवंतानी स्वप्नात येवुन सांगितले की गुजरात येथील सौराष्ट्रा येथे डाकोर या ठिकाणी मी तुला मुर्ती रूपात दर्शन देईन, ती मुर्ती कोठेही जमीनीवर स्पर्श न होता घेवुन जावयाची आहे, भगवंतानी सांगीतल्या प्रमाणे राजा आपल्या काही साथीदारासह डाकोर येथे आला, व येथील तळ्यात उतरून श्रीहरींचे स्मरण करू लागला. श्रीहरींची मुर्तीचा राजाच्या हाताला स्पर्श झाला राजा व त्याचे सहकारी आनंदीत होऊन मुर्ती पालखीत घेऊन मुल्हेर कडे येण्यास निघाले, मार्ग डोंगर दऱ्याच्या असल्यामुळे ते मजत दरमजल करत अमळी या गावा पर्यंत आले, येथे ते काही काळ विश्रांती साठी थांबले तेव्हा मुर्ती असलेली पालखी झाडाला बांधली जेणे करून तीचा स्पर्श जमीनीला होऊ नये या पद्धतीने जमीनीपासुन अंतर ठेवले नंतर पुढील प्रवासासाठी पालखी घेण्यासाठी झाडाजवळ आले असता पालखी जमिनीला टेकली गेली होती. तेव्हा राजा व त्याचे सहकाऱ्यांनी आपल्या जवळील घोडे, हत्ती यांना बांधुन मुर्ती असलेली पालखी ओढण्याचा प्रयत्न केला, तरी जमीनी पासुन थोडीही सरकली नाही. तेव्हा राजा हताश झाला भगवंताची ईच्छा समजुन तो मुर्ती अमळी येथेच सोडुन निघुन  गेला.
     त्यानंतर जवळ जवळ दोन-अडीचशे वर्षानंतर मुर्तीवर मुंग्यांचे वारूळ मातीच्या ढीग होऊन टेकडीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यावेळी "पावबा" नावाचे हरीभक्त आपल्या भागात दुष्काळ पडल्यामुळे आपल्या जनावरांना घेऊन डांग येथे जात असतांना त्यांना वाटेत आमळी गाव दरम्यान पाणी पाऊस चांगला असल्याचे दिसले, तेव्हा त्यांनी डांग येथे जाण्यापेक्षा येथेच (आमळी) येथे थांबणे पसंत केले. त्यांना एके दिवशी भगवंतानी स्वप्नात येऊन सांगीतले की जवळ असलेली माती खालील मुर्ती आहे, ती काढ व मंदिर बांध.  स्वप्नातील दृष्टांता प्रमाणे पावबा महाराजांनी मातीचा ढिगारा उपसला आणि पाहतो तर, श्रीहरींची भव्य - दिव्य अशी शेष - शैय्यावरील लक्ष्मीनारायणाची मुर्ती पाहुन पावबा महाराज आनंदीत झाले, परिस्थीती गरिबीची असल्यामुळे मंदिर बांधण्यासाठी धन कोठुन आणावे, या चिंतेत पावबा महाराज होते. तेव्हा त्यांना रात्री स्वप्नात दृष्टांत भगवंतांनी दिला की जवळच उत्तरेस एक छोटासा डोंगर ( ज्याला आज धनसरा म्हणतात ) आहे. तेथे जा डोंगरावर तुला मंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेले धन मिळेल.
     स्वप्नातील दृष्टांता प्रमाणे पावबा महाराज डोंगरावर गेले तेव्हा त्यांना तेथे सोन्याच्या मोहरा मिळाल्या, त्यातुन त्यांनी भव्य -दिव्य अशा मंदिराचे बांधकाम इ. स. १६१४ मध्ये केले. आणि जवळ जवळ हजार वर्षापूर्वी द्धारकेतील श्रीहरींची मुर्तीचा प्रवास डाकोर हुन आमळी येथे पूर्ण झाला. त्या मुर्तीची स्थापना श्री पावबा महाराजांनी केली. असे हे महान तिर्थक्षेत्र श्री. कन्हैय्यालाल महाराज या नावाने ओळखले जाते.

।।  देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी   ।
।    तेणे मुक्ती चारी, साधियेल्या    ।
।  हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा  ।
।    पुण्याची गणना कोणी करी     ।।

।।  जय जय राम कृष्ण हरी  ।।


No comments:

Post a Comment