Monday 6 March 2017

जय शेंदवड भवानी

जय शेंदवड भवानी 

शेंदवड भवानी हा गड महाराष्ट्राच्या धुळे, नाशिक आणी गुजरात राज्याच्या सिमेवर आहे. शेंदोड भवानी मातेचे मंदीर हे उंचावर आहे. श्री शेंदवडभवानी माता मंदीर हे महाराष्ट्र मध्ये धुळे जिल्यात आहे. नाशिक व धुळे या दोन जिल्हे लागून आहे. गडावरून अतीशय सुंदर निसर्गरम्य द्रूष्य दिसते.

मी आणी माझे सहकारी आमचा प्रवास २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता कुडाशी या गावाहुन सुरु झाला गडाच्या पायथाला आम्ही ९.५८ पोहचलो गडावर जाण्यासाठी दोन पाय वाट आहे. गडाच्या उजव्या बाजूस पायवाट आणि डाव्या बाजूस पायवाट आहे.

गडाच्या उजव्या बाजूची पायवाट ही लांबलचक आहे गडावर पोहचण्यासाठी ३.३० तासाचा कालावधी लागतो. या मार्गाने येताना थकवा जास्त जाणवत नाही.

डाव्या बाजूची पायवाट ही कठीण तसेच थकवणारी आहे ही वाट एखाद्या इमारतीच्या पायऱ्या प्रमाणे चढण आहे ही वाट दगडं मधून आहे या वाटेत पसरट मैदान किंवा पसरट जागा बसण्यासाठी नाही आहे. या वाटेवर बसण्यासाठी उतरती जागा आहे या गडावर पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे या गडावर माकडे आहे.  या भागात वाघा वावरत असतो.



No comments:

Post a Comment